नळदुर्ग, दि. 08 : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी ता. तुळजापूर येथील टोलनाक्याच्या मनमानी कारभारा विरोधात नळदुर्ग शहर शिवसेनेच्यावतीने शनिवार दि. 10 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

गेल्या काही महिन्यापासून फुलवाडी येथील टोलनाका सुरु झाले आहे. मोठ मोठे फलक लावून वाहन टोल आकारणीचे दरपत्रक लावले आहे. त्यानुसार रिटर्न टोल पास दिला जात नसल्याने वाहन धारकांना टोल करापोटी दुप्पट रक्कम द्यावी लागत आहे. त्याचबरोबर टोलनाका परीसरातील जवळपास १० ते १५ किलोमीटर च्या आतमधील वाहनांना टोल आकारला जाऊ नये असा नियम असताना या टोलनाक्यावर या नियमाचेही उल्लंघन होत आहे. आज नळदुर्ग शहरातील वाहनधारकानाही या टोलनाक्यावर टोल आकारला जात आहे. या विेराधात शिवसेनेच्यावतीने उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दि. 10 रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.  शहरातील खासगी वाहन चालकानी आपल्या वाहनाचे नंबर पुढील मोबाईल क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

संतोष पुदाले ९७६५८०१२७१, सुनिल गव्हाणे ८३२९४२५११३

 
Top