कळंब, दि. 08 : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास महाराष्ट्र राज्य सरकारने स्थगिती दिल्यामुळे कळंब येथे रयत क्रांती संघटना महिला आघाडीच्या वतीने राज्य सरकारच्या निर्णयाचे व पत्राचे होळी करण्यात आले. दरम्यान, राज्यसरकारने दिलेली स्थगती त्वरित दुर करण्याची मागणी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सोनाली शिंदे यांनी केली आहे.
यावेळी सौ.सोनाली शिंदे, सौ.यास्मिन शेख, सौ.जयमाला निगुंळे, सौ. अश्विनी मस्के, सौ. ज्योती जगताप, हनुमंत निगुंळे, रितेश शिंदे, नमन मस्के, सौ. सलमा सौदागर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
