नळदुर्ग : एस.के. गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी येथे शालेय पोषण आहार शालेय विद्यार्थ्यांना घरपोच वाटप करण्यात आले.

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मानवी साखळी थोडण्याकरीता गेल्या सहा  महिन्यापासून देशातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्या कधी नियमित सुरु होतील हे निश्चित सांगता येत नाही.असे असले तरी शाळा बंद शिक्षण चालू म्हणत आँन लाईन आभ्यासक्रम चालू आहे. ग्रामीण भागात आडचणीला तोंड द्यावे लागत आहे. बहुतांश पालकाकडे वाँट्स अँप मोबाईल नाहीत, रेंजचीही समस्या आहे. म्हणून विद्यार्थ्यांना शालेयक्ष स्वाध्याय पस्तिका देण्यात आलेल्या आहेत. जसे शाळा बंद शिक्षण चालू तसे शाळा बंद पोषण आहार चालू म्हटल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजने अंतर्गत घरपोच पोषण आहार देण्याची सोय शासनाने केली आहे. नुकतेच जि.प.प्रा शा.वागदरी येथे दुसऱ्या टप्प्यातील माहे जून, जुलै, आणि आँगस्ट या तिन महिण्याच्या कोट्यतील तांदूळ, मुगदाळ, व हरभर आदीचे वाटप येथील पालकांना करण्यात आले.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जत्ते, सह शिक्षक किसन जावळे, तानाजी लोहार,शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षा लक्ष्मी चिनगुंडे,मिराबाई बिराजदार, सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील, शिवाप्पा जवळगे, सह पालक उपस्थित होते.

 
Top