उस्मानाबाद : महेश पाटील

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या उस्मानाबाद तालुका अध्यक्ष पदी बेंबळीचे सुपूञ गणेश राऊत यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र नाभिक महिमंडळाचे प्रदेश अध्यक्ष कल्याण दळे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. 

गणेश राऊत यांनी चार वर्षापूर्वी बारा बलुतेदार महासंघाचा  जिल्हास्तरीय मेळावा ग्रामिण भागातील बेंबळी येथे आयोजित करून यशस्वी करून दाखवला. या कामाची दखल घेऊन त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून गणेश राऊत हे सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतात. तसेच कल्याण दळे यांचे ते खूप विश्वासू आहेत. त्यांच्या निवडीबद्दल बालाजी माने, दगडू पेंटर, पांडूरंग शिंदे, दत्ता शिंदे, रामकिसन राऊत, महेश पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

समाजातील समस्या सोडविण्यासाठी सक्रिय राहून प्रयत्न करणार असून दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे गणेश राऊत यांनी "तुळजापूर लाईव्ह" शी  बोलताना सांगितले.

 
Top