जळकोट : मेघराज किलजे

उस्मानाबाद जिल्हा शिक्षक पतसंस्थेतर्फे नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र झाल्याबद्दल होर्टी केंद्र शाळेतील शिवतेज बालाजी माळी या गुणवंत विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन मनोज चौधरी, जळकोट बीटचे  विस्तार अधिकारी जी. एन. सर्जे, होर्टीचे केंद्रप्रमुख अरुण अंगुले, बोरगावचे केंद्रप्रमुख शिवाजी सुरवसे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष डी.डी. कदम, ओबीसी कर्मचारी महासंघाचे तालुकाध्यक्ष तथा शिक्षक संघाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालाजी माळी, संभाजीनगरचे मुख्याध्यापक धनराज रेणुके, प्रशालेच्या मुख्याध्यापिका टोणपे, सिध्देश्वर कुंभार, भिमराव अंगबरे, उमेश भोसले, जगन्नाथ शिंदे, श्रध्दानंद स्वामी, सत्यवान अभिवंत, होर्टी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.

 
Top