उस्मानाबाद : महेश पाटील

गेल्या महिन्यात उस्मानाबाद जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांची बदली झाल्याने त्या पदस्थापनेवर सद्य परिस्थितीमध्ये प्रभारी म्हणून उपमुख्यकार्यकारी यांच्याकडे हा पदभार आहे. तसेच जिल्हा परिषद मधील 13 शिक्षण अधिका-यांची सुध्दा बदली झाल्याने हे पद सध्या प्रभारीच्या खांद्यावर आहे.

ग्रामीण प्रकल्प संचालक पद हेही तीन वर्षापासून रिक्त असून त्या पदावर प्रभारी उपमुख्यकार्यकारी अधिकारी हे होते. त्यांचीही बदली झाल्याने ग्रामीण प्रकल्प अदयाप ही पदस्थापना रिक्तच आहे. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंताची बदली झाल्याने कार्यकारी अभियंता हे पद रिक्त आहे. सध्या जिल्हा परिषद मध्ये प्रभारी राज सुरू असल्याचे चिञ दिसत असून सर्व कामे प्रलंबित आहे. अन सध्या ते संथ गतीने सुरू आहेत.

सध्या सत्ताधारी लोकप्रतिनिधीचा जिल्हा परिषद प्रशासनावर वचक न राहिल्याने अशा गोष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक कामे प्रलंबित आहेत व रिक्त पदस्थापना असल्याने ग्रामीण भागातील अनेक कामांना अडथळा निर्माण होत असल्याचे  जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांनी  "तुळजापूर लाईव्ह" शी बोलताना सांगितले.

 
Top