अणदूर, दि. 01 : उत्तरप्रदेश राज्यातील हाथरस येथील बलात्कार पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना उत्तरप्रदेश सरकारने, पोलिसांनी आडवून त्यांना ताब्यात घेऊन, काँग्रेस कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीचार करण्यात आलेल्या घटनेचा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
हाथरस येथे एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे या गरीब कुटुंबाची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी हे उत्तर प्रदेशातील हाथरस येथे जात असताना उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांना आडऊन ताब्यात घेतले होते व काँग्रेस कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीचार करण्यात आला. त्याचा जाहीर निषेध माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केला आहे.
