चिवरी : राजगुरु साखरे

तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात गुरूवारी दुपारी एक तास पावसाने झोडपून काढले. यामध्येच काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले. ज्यांचे सोयाबीन पीक काढून टाकलेले आहे त्यांचे तर प्रचंड नुकसान झाले आहे. काहींचे ऊस पिक जमीनदोस्त झाले आहे. शेतकऱ्यांनी  काढून टाकलेले सोयाबीन पीक झाकण्यासाठी प्रचंड तारांबळ उडाली होती.

काढणीला आलेले नगदी पीक म्हणून शेतकरी ज्यांच्याकडे पाहतो त्या सोयाबीन पिकांच्या उत्पन्नावर बळीराजा धुमधडाक्यात दिवाळी सण साजरा करीत असतो. यंदा मात्र या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्याची जगणे धोक्यात आले आहे. परतीच्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीकांचे आतोनात नुकसान झाले आहे. कोरोनाशी मोठ्या जिद्दीने दोन हात करणारा शेतकरी आता मात्र या आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

 
Top