तुळजापुर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र  महोत्सवास शनिवार दि. १७ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने भाविकांविना प्रारंभ होणार आहे. 

गेल्या दि. ९ ऑक्टोबर पासुन श्री तुळजाभवानी मातेची सुरु असलेली मंचकी निद्रा सुरु शनिवार समाप्त होणार असून श्री देवीजींची मुख्य चल मुर्ती पलंगावरील शेजघरातुन पहाटे सिहासंनावर प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. यानंतर श्री देवीजीस पंचामृत दुग्धा अभिषेक घालुन श्री देवीजीस वस्त्र अलंकार चढवुन धुपारती करण्यात येते. 

यानंतर परत एकदा सकाळी श्री देवीजीस पंचामृत अभिषेक घालण्यात येतात. त्यानंतर श्री देवीजीस वस्त्र अलंकार चढवुन धुपारती होऊन श्री गोमुख तिर्थ कुंडाजवळ तीन घटकलशाची विधीवत पुजा  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावर यांच्या हस्ते सहकुंटुब यथासांग होणार आहे. दुपारी १२ वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापनेने  शारदीय नवरात्र  महोत्सवाचा प्रारंभ भाविका विना होणार आहे. या नवरात्र  महोत्सवात भाविका विना सर्व धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने संपन्न होणार आहेत.

 
Top