खानापूर : बालाजी गायकवाड 

अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. यानुसार खानापूर शिवारातील नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत  करण्यात आले.

परतीच्या पावसाने सोयाबीन ,ऊस ,कांदा सह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.याची दखल घेत जिल्हाधिकारी मा.कौस्तुभ दिवेगावकार यांनी  नुकसान झालेल्या पीकांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार खानापूर येथे तलाठी प्रशांत देशमुख ,कृषी सहाय्यक दुधभाते,ग्रामसेवक एस.ए घुले, पोलीस पाटील अमोल हिप्परगे व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.

ऊस, सोयाबीन, कांदा यासंह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोयाबीनच्या गंजी लावून ठेवल्या होत्या.पाण्याच्या प्रवाहाने अख्या गंजी पाण्यात  वाहून  गेल्या आहेत.तर पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने ऊस आडवा झाला आहे.अनेक जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत अद्याप त्यांचा शोध लागला नाही याची नोंद घेण्यात आला आहे.गावात ओढ्याचे पाणी शिरल्याने अनेक नागरिकांचे संसार उपयोगीसाहित्याचे नुकसान झाले आहे.तर अनेक नागरिकांच्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत.या सर्व घटनांचे पंचनामे करण्यात आले.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे व गावातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याची तात्काळ दखल घेऊन त्वरित आर्थिक  मदत घ्यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी केली आहे.

 
Top