वागदरी : एस.के. गायकवाड

चित्ती नक्षत्राच्या सुरूवातीलाच सरत्या पावसाने तुळजापूर तालुक्यातील वागदरी व परिसरात सर्वदुर रात्रभर ढगफुटीगत पाऊस पडल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले असून बोरी नदीला मोठा पूर आल्याने नदीवरील सर्व केटी बंधाऱ्याच्या वरुन पाणी गेले.नाले तुडुंब भरभरून वहात आहेत.बऱ्याच वर्षानंतर एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची चर्चा जाणकार व्रध्द मंडळीत होत आहे. परिणामी अंतिम टप्प्यात आलेली सोयाबीन पिक काढणी खोळंबली असून रब्बी हंगामातील ज्वारी व अन्य पिकांची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

    दि.१३आँक्टोबंर रोजी संध्याकाळी ८.०० वा.पासून हळूहळू पावसाला सुरुवात झाली. रात्री १०.०० वा.पावसाने जोर धरला. रात्रभर तब्बल १३ तास म्हणजे दि.१४आँक्टोबंर रोजी  सकाळी १०.०० वा.पर्यंत जोरदार पाऊस पडला. "आल्या चित्ती तर पडतील भिंती" असी म्हण या नक्षत्रील पावसा बाबत म्हटली जाते याचा प्रत्येय प्रत्यक्ष अनुभवास आला.वागदरी येथील काही घरांच्या भिंती पडल्या तर काही भिंती रात्रभर पडलेल्या पावसाने फुगलेल्या आहेत कधी पडतील हे सांगता येत नाही. तसेच काही घरात गटारी उलथून पावसाचे पाणी घरात घुसले त्यामुळे कुटुंबाची तारांबळ उडाली.या नक्षत्रातील अजून दहा बारा दिवस शिल्लक आहेत.पावसाचे वातावरण तर कायम दिसत आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीनची काढणी आणि ज्वारीची पेरणी कसी करायची आशा दुहेरी संकटात सापडला आहे. जर पाऊस नाहीच थांबला तर सोयाबीनला फडातच कोंब फुटून मोठे नुकसान होणार आहे. तर रब्बी हंगामातील पिक पेरणी लांबल्याने तेही शेतकऱ्यांच्या हाती लागेल असे खात्रीपुर्वक सांगता येत नाही. शिवाय मुसळधार पडलेल्या पावसाने ऊस उत्पादक शेकऱ्यांचा  फडात ऊस आडवा पडलेला आहे. त्यामुळे शेतकरी सध्या चिंताग्रस्त झाल्याचे जाणवत आहे.



 
Top