अवदुतवली दर्गा मध्ये पाणी शिरल्याने मोठे झाड भिंतीवर पडले

इटकळ दि. १४ : संततधार १५ तास पावसाने इटकळ ता. तुळजापूर परिसरातील तलाव,नाले,ओढे ओव्हर फुल होवून ओसंडून वाहत असुन शेतक-यांच्या पिकात पुराचे पाणी शिरले. इटकळ येथील अवदुतवली दर्गा मध्ये पाणी शिरल्याने मोठे  झाड भिंतीवर पडून नुकसान झाले आहे.

मंगळवारी राञी ९पासून बुधवारी दुपारी १२वाजेपर्यंत सतत पाऊस पडल्याने बाभळगाव,इटकळ,काटगाव,येथील तलाव भरुन सांडवे वाहत आहेत.परिसरातील सर्व ओढे नाले ओसंडुन वाहत आहेत.  तर बाभळगाव ता.तुळजापूरला येथील पळस निलेगाव तलाव भरुन सांडवा वाहत आसल्याने बाभळगावाचा इतर गावाशी येणारा संपर्क बंद झाला आहे.

 
Top