चिवरी : राजगुरु साखरे
तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात मागील चार दिवसापासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून खरिपाचे अतोनात नुकसान झाले आहे, सतत पडणाऱ्या पावसामुळे चिवरी गावच्या शेजारील गावाशी संपर्क तुटला असून, ओढे ,नाले तुडुंब वाहू लागले आहेत.
आजही सकाळपासून पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शेतात सोयाबीनच्या गंजीमध्ये घुसल्याने सोयाबीनचे प्रचंड नुस्कान झाले आहे तसेच गावातील असणारा एकमेव साठवण तलाव पहिल्यांदाच सांडवा सुटल्याने, सांडवे द्वारे येणारे पाणी गावालगतच्या पुलावरून थेट गावच्या वेशिला येऊन ठेपले होते. तसेच यंदा प्रारंभीपासून तालुक्यात दमदार पाऊस होत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सर्वच नदी-नाले तसेच साठवण तलाव भरून वाहत आहेत, मात्र या पावसाने तीन जिल्ह्यातील दुष्काळ मिळवला असला तरी खरीप हंगाम शेतकऱ्याचे हातून काढून घेतला असल्याचे चित्र आहे. मागील दोन दिवसात पावसाने पुन्हा झोडपल्याने शिल्लक असलेले पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या हातून गेली. तालुक्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, बहुतांशी लघु मध्यम तसेच टाकून तलाव तुडुंब भरले आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या सिंचनासाठी संबंधित प्रकल्पावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अशा प्रकल्प क्षेत्रातील गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही मात्र या पावसाने खरीप हंगामातील पिकाची अतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळे सध्या शेतकरी बांधव आतून अतिवृष्टी झालेल्या पिकाचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी बांधव आतून होत आहे.

