हिंगोली, दि. 06 : जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील ऐतिहासिक नगरीतील बहुचर्चित सेवालाल महाराज यांच्या मंदिराच्या जागेवर जावून गोर बंजारा शिक्षण सेवा अभियान, भारत व गोर बंजारा ब्रिगेड , हिंगोली जिल्हा टीम ने मंदिराच्या जागेची पाहणी केली.

या जागेवर सेवालाल महाराज व याडी जगदंबा देवीचे मंदीर उभारलेले असून त्यासमोर भव्य असा सभा मंडप उभारण्याचे नियोजन आहे. तसेच गोर बंजारा शिक्षण सेवा अभियान महाराष्ट्र च्या माध्यमातून गोर बंजारा समाजातील गरीब, शेतकरी, कष्टकरी, कामगार, ऊस तोड कामगार यांच्या मुलांसाठी बांधकाम करून विद्यार्थ्यासाठी हॉस्टेलच्या माध्यमातून राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे निवृत मुख्याध्यापक सीताराम पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच हा प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन गोर बंजारा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांनी उपस्थितांना दिले.

यावेळी पोहरागड येथील  बापू रमेश महाराज, खान्देश विभागीय समन्वयक भरत पवार, औरंगाबाद विभागीय समन्वयक डॉ. दिनानाथ पवार, पुणे विभागीय समन्वयक जयवंत राठोड, लातूर विभागीय समन्वयक डॉ. मुकेश पवार, हिंगोली जिल्हा समन्वयक नकुल जाधव, पोहरागड येथील अर्जुन पंडित यांची विशेष उपस्थिती होती. सोबतच सावळी तांडा, दरेगाव तांडा, गलांडी तांडा, औंढा तांडा, बंजारा कॉलनी येथील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 
Top