तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिनी म्हणजे शनिवारी सायंकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंकरराव गडाख यांनी महाद्वार बाहेरुन आई तुळजाभवानी मातेची यथा सांग पुजा, आरती करवुन संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाचे सावट दुरु होवू दे, तसेच निसर्गच्या अवकृपेमुळे आलेले बळीराजावरचे संकट दुर होवु दे, असे साकडे श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात घातले.
यावेळी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश निबांळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद निबांळकर, तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे, शिवसेनेचे श्याम पवार, सुधीर कदम, प्रतिक रोचकरी, बाळासाहेब शिंदे, बापुसाहेब नाईकवाडी, सागर इंगळे, संजय भोसले, सुनील जाधव आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.