तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी, आदी माया आदी शक्ती असलेल्या, साडेतीन शक्ती पिठा पैकी एक पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात दि. १७ शनिवार रोजी "संभळाच्या कडकड्यात "आई राजा उदो उदो च्या गजरात भक्ताविना शारदीय नवराञ महोत्सावास प्रारंभ झाला. दरम्यान, सायंकाळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीर परिसरात प्रक्षाळ पुजेस सुरुवात झाल्यानंतर पहिल्या माळेदिनी छबीना काढण्यात आला. इतिहासात प्रथमच शारदीय नवराञ महोत्सव संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे भक्ताविना साजरा होत आहे.
तत्पूर्वी, शारदीय नवराञ महोत्सवापुर्वी ९ दिवस श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा असलेली मुख्य चलमुर्ती शेजघरातील पलंगावरुन दि. १७ शनिवार रोजी पहाटे ३ वाजता सिंहासनावर विराजमान झाली. त्यानंतर श्री देवीजीस प्रथम दुग्धा अभिषेक घालुन श्री देवीजीस वस्ञोअलंकार पुजा करवुन धुपारती करण्यात आली. यावेळी श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, मुख्य भोपे, पाळीचे पुजारी, मंदीर संस्थानचे विश्वस्त तहसीलदार सौदागर तांदळे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले आदीसह पाळीकर पुजारी, सेवेदारी, मंदीर कर्मचारी उपस्थित होते.
सकाळी ६ वाजता परत एकदा श्री देवीजीस पंचामृत अभिषेक घालुन वस्ञोअलंकार चढवुन शारदीय नवराञ महोत्सवाची पहिल्या दिनाची नित्योपचार पुजा करुन धुपारती करण्यात आली. यानंतर श्री गोमुख तिर्थ कुंडाजवळ तीन घटकलशाची जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर व त्यांच्या पत्नी प्रियंका कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते तीन घटकलशाची विधिवत यथा सांग पुजा करुन पारंपरिक वाद्याच्या गजरात आई राजा उदो गजरात श्री तुळजाभवानी मातेच्या सिंह गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आली. या घटस्थापनेस प्रथम पान्याच्या विड्याची शारदीय नवरात्र महोत्सवाची पहिल्या माळेची माळ घालुन घटस्थापेनेस प्रारंभ झाला. या नंतर श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारातील उपदैवता असलेल्या येमाई देवी, खंडोबा मंदीर, टोळ भैरव मंदिर, आदीमाया आदी शक्ती मंदीरात विधीवत पुजा करुन घटस्थापना करण्यात आली.
या शारदीय नवराञ महोत्सवाच्या धार्मिक सोहळ्यास जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर, त्यांच्या सुविद्यापत्नी प्रियंका कौस्तुभ दिवेगावकर, तहसीलदार सौदागर तांदळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, मुख्याधिकारी आशिष लोकरे, श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत हमरोज बुवा, पाळीचे मुख्य भोपे पुजारी यशराज मुकुंद कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव सांळुके, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, सरकारी उपाध्ये बंडोपंथ पाठक, श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य भोपे पुजारी संजय सोंजी, सुधीर कदम, प्रशांत सोंजी, जगदीश पाटील, विनोद सोंजी, शशीकांत पाटील, विश्वजीत पाटील, पाळीकर पुजारी मंडळाचे संचालक अविनाश गंगणे, नागेश सांळुके, विशाल रोचकरी, प्रा.धनंजय लोंढे, सुधीर रोचकरी, अभिजित कुतवळ, उपाध्ये पुजारी मकरंद प्रयाग, नागेश शास्ञी अंबुलगे आदीसह भोपे पुजारी, पाळीकर पुजारी, उपाध्ये पुजारी, सेवेदार सभांजी चोपदार, दुर्गेश छञे, राम छञे, गणेश चोपदार पोहेकर आदीची उपस्थिती होती.
शारदीय नवराञ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मातेचे मानकरी शेटे परिवाराच्या वतीने घटस्थापनेस धान्य देण्यात आले.