तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात शारदीय नवराञ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि.24 शनिवार रोजी श्री तुळजाभवानी मातेची दरबारात महिषासुर मर्दीनी अलंकार महापुजा मांडण्यात आली.
अनादी कालामध्ये महिषासुर राक्षसाचा या धरतीवर खुप आराजकता माजवली होती. अनुभती म्हणुन एक निछ्म भक्त होती. श्री देवीला प्रसन्न करुन घेतले व त्या महिषासुराचा वध दुर्गाष्टमी दिनी श्री देवीने केल्याची अख्यायिका आहे.
ततपुर्वी पहाटे श्री देवीचे चरण तिर्थ होऊन सकाळी पंचामृत दुग्धा अभिषेक करुन श्री देवीजीस हिरे जडीत वस्ञोअलंकार शालु (पैठणी) परिधान करण्यात आले. त्यानंतर गाभाऱ्यात श्री तुळजाभवानी माता महिषासुराचा वध करताना प्राथमिक स्वरूपात दृश्य मांडण्यात आले होते. यानंतर धुप आरती करवुन अंगारा काढण्यात आला. शारदीय नवराञ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आठव्या माळेची नित्योपचार पुजा करवुन सिंह गाभाऱ्यातील घटास ८ व्या माळेची झेंडु च्या पानाची माळ घालण्यात आली.
या वेळी श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य भोपे पाळीचे पुजारी राजेश मलबा, अतुल मलबा, अमर राजे परमेश्वर, समाधान परमेश्वर, दिनेश परमेश्वर, संजय सोंजी, समाधान परमेश्वर, सचिन परमेश्वर, प्रशांत सोंजी आदीसह श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत, भोपे पुजारी बांधवानी श्री तुळजा भवानी मातेची महिषासुर मर्दीनी अलंकार महापुजा मांडली होती. या धार्मिक पुजेच्या सोहळ्या दरम्यान श्री तुळजाभवानी मंदीर धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, मुख्यभोपे, पाळीकर पुजारी, उपाध्ये पुजारी आदीसह सेवेदार उपस्थित होते.
श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात शनिवारी पहाटे 2 वाजता मंदीरातील यज्ञ मंडप असलेल्या होम कुंडावर दुर्गाष्टमी दिनाचे औच्युत साधुन वैद्दीक होमास आरंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व त्यांच्या पत्नी सौ.प्रियंका कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते दुर्गाष्टमी दिनी होम कुंडावरती विधीवत पुजा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांचे आई, वडील, सासु सासरे, तहसीलदार सौदागर तांदळे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, मंदीराचे कर्मचारी नागेश शितोळे, जयसिंग पाटील, प्रविन अमृतराव आदीसह उपाध्ये पुजारी, मंदीर कर्मचारी उपस्थित होते.
शारदीय नवराञ महोत्सवाच्या धार्मिक सोहळ्याची नित्योपचार पुजा सकाळी व संध्याकाळी करण्यात येत होती. शनिवारी सायंकाळी प्रक्षाळ पुजेस प्रारंभ होवून श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात आठव्या माळे चा छबिना काढण्यात आला. शारदीय नवराञ महोत्सवाच्या या आठ दिवसाच्या कालावधीत संसर्गजन्य कोरोना साथी च्या रोगामुळे श्री तुळजाभवानी मंदीरात श्री देवी भक्तांना प्रवेश बंद आहे. दि.25 रविवार रोजी खंडे महानवमी होमावर धार्मिक विधी संपन्न होणार आहे. रविवारी घटोथ्यापन होणार आहे. तर दि.26 सोमवार रोजी सिमोल्घंन होणार आहे.