तुळजापुर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जणांचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात शारदीय नवराञ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. 20 मंगळवार रोजी चौथ्या माळे दिनी ललित पंचमी दिनाचे औचित्य साधुन रथअलंकार पूजा मांडण्यात आली होती. भगवान सुर्य नारायण यांनी ञिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री तुळजाभवानी मातेस दिला म्हणून रथ अलंकार मांडण्यात येते, अशी आख्यायिका आहे. 

तत्पूर्वी पहाटे श्री देवीचे चरण तिर्थ होऊन सकाळी पंचामृत दुग्धा अभिषेक करुन श्री देवीजीस हिरे जडीत वस्ञोअलंकार शालु (पैठणी) परिधान करुन लंलित पंचमीची नित्योपचार पुजा करुन धुपारती करण्यात आली. यानंतर श्री देवीजीस छञपती शिवाजी महाराजानी दिलेले मौल्यवान दागिने घालण्यात आले. या वेळी श्री तुळजाभवानी मातेचे महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, पाळीचे मुख्य भोपे पुजारी सुरेश परमेश्वर, सुधीर परमेश्वर, समाधान परमेश्वर, अतुल मलबा, संदीप परमेश्वर, नागेश परमेश्वर आदीसह मुख्य भोपे पुजारी बांधवानी श्री तुळजाभवानी मातेची रथ अलंकार महापुजा मांडली.

या धार्मिक पुजेच्या  सोहळ्या दरम्यान श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, मंदीर कर्मचारी आदीसह सेवेदार संभाजी चोपदार, दुर्गेश छञे, गणेश चोपदार, पोहेकर, पलंगे, सेवेकरी बांधव उपस्थित होते.


व्हिडिओ पहा -



 
Top