तुळजापुर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये होत असलेल्या परीक्षांच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभाराचा उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने मंगळवार दि. 20 रोजी निषेध करुन आंदोलन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना राष्ट्रवादी विद्यार्थी  संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके यांनी निवेदन सादर केले. 

यावेळी रा.काँ.चे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, रोहित चव्हाण, सौरभ देशमुख, आदित्य शेटे, संकर्षण देशमुख, प्रसाद मुंडे, प्रणव देशमुख, चैतन्य पाटील, प्रज्वल अंगुले, महेश सुरवसे यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी  उपस्थित होते.

 
Top