तुळजापुर : कुमार नाईकवाडी

शारदीय नवराञ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व महसुल विभागाने नगरपालिकेला विश्वासात न घेता शहरातील निर्णय स्वःताच घेतल्याने सदरील प्रशासनाबाबत नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महसुल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि न.प. नगराध्यक्ष चा वाद ऐन नवराञ महोत्सवाच्या तोंडावर चिघळला.  

तुळजापुर न.प. कार्यालयात शुक्रवार दि. १६ रोजी न.प. कार्यालयात तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी म्हणाले की, शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि महसुल प्रशासनाने आम्हांला विश्वासात न घेता शहरातील निर्णय घेतल्याने पोलीस प्रशासन आणि महसुल प्रशासना बाबतीत तिव्र नाराजी व्यक्त केली. संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे श्री देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पोलीसांनी जरुर रोखावे त्यास आमचा अजिबात विरोध नाही. शहराबाहेर बँरिकेटस लावुन अंत्यत कडक व्यवस्था करावी किंवा मंदीराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ५० मिटर रस्त्यावर बँरिकेटस लावुन कडक व्यवस्था करावी. त्यासही आमंचा विरोध नाही. माञ शहरातील बाजार पेठामध्ये जिवनाश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी किंवा आजारी पेशंटला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी, तसेच न.प. मार्फत शहरातील स्वच्छता करण्यासाठी टँक्टर, कचरा घेऊन जाण्यासाठी, घंटा गाड्या  जाणाऱ्या रस्त्यावर विनाकारण पोलीसांनी मनमानी करुन बँरिकेटस लावल्याने शहरातील जाणाऱ्या रस्त्यावर मोठी गैरसोय होत आहे. 

तुळजापुर शहरातील बाजार पेठा सुरळीत नाही झाल्या तर आम्ही गाव बंद करणार? शहरातील नागरीकांचे व्यवसाय सुरळीत झाले पाहिजे, शहरातील अनेक भागात विनाकारण बँरिकेटस लावल्याने शहरातील नागरीकांना मोठा नाहक ञास होत आहे. शहरातील जिवनाश्यक वस्तुसह इतर यंञणा चालु झाली पाहिजे, पोलीस प्रशासनानी आम्हांला विश्वासात न घेतल्यामुळे शहरातील यंत्रणेत मोठी बिघाड झाली आहे. तरी शहरातील सुरळीत व्यवहार चालु झाले पाहिजे अशी आमंची मागणी असल्याचे रोचकरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

यावेळी विनोद गंगणे, नगरसेवक किशोर साठे, औंदुबर कदम, माऊली भोसले, नानासाहेब लोंढे, अभिजित कदम, शहाजी लोंढे आदीसह पञकार बांधव उपस्थित होते.

 
Top