जळकोट, दि. 6 : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष व जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद विठ्ठल चुंगे(वय-४८) यांचे सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवार(दि.५) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर जळकोट येथील स्मशानभूमीत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. जळकोट परिसरात एक प्रेमळ नेतृत्व म्हणून ते परिचित होते.कोरोना काळात त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून गोरगरिबांना किराणा मालाचे वाटप केले होते. लहानपणापासून शिवसेनेच्या विचाराशी पाईक राहुन अनेक पदावर त्यांनी काम केले होते.

 
Top