उस्मानाबाद, दि. 03 : उस्मानाबाद जिल्हयात आज शनिवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 107 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तसेच आज दिवसभरात 203 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 571 झाली आहे. यातील 9 हजार 927 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 389 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 255 जणांवर उपचार सुरु आहे.





