उस्मानाबाद, दि. 11 : उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार दि. 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 84 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 60 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 13 हजार 376 झाली आहे. यातील 11 हजार 224 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 431 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 721 जणांवर उपचार सुरु आहेत.
