तुळजापुर : कुमार नाईकवाडी

मंगळवार रात्रीपासुन बुधवारी  दुपार पर्यत  मुसळधार पाऊसाने तुळजापुर शहर व परिसरास  झोडपून काढले. शहरातील अनेक भागात पाऊसाचे पाणी घरात शिरले. तसेच श्री तुळजाभवानी मंदिरात सुध्दा पावसाचे पाणी शिरले होते. अनेक भागात घराची देखील मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. शहरातील अनेक भागात पाऊसाच्या पाण्याना तळ्याचे स्वरुप आले होत. शहरातील रस्त्यावर जोर जोराने मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.


शहरातील अनेक भागातील रस्त्यावर पाण्याचे लोंढे खळखळुन वाहत होते शहरातील रस्त्यावर च्या पाण्याचे लोंढे श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीराजवळील राजे शहाजी महाद्वार व राज माता जिजाऊ महाद्वार या ठिकाणी पाऊसाचे पाणी ओसांडून वाहत असल्यामुळे या पाऊसाच्या पाण्याचे लोंढे श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीरात घुसले होते. माञ वेळीच न.प.कर्मचारी वर्गानी या वाहत्या पाण्याची वाट रिकामी करुन दिली शहरातील नाल्या पाऊसाच्या पाण्याने तुंडूब भरल्या होत्या.

रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. शहरातील कांही भागात मोठ्या प्रमाणावर पाऊसाचे पाणी साचल्याने अनेकांच्या घरात पाणी घुसले. तुळजापुरात बुधवारी पाऊसाचा धुमाकुळ सुरु झाला होता. अक्षरशा तुळजापुर कराना पाऊसाने मोठ्या प्रमाणावर झोडपल्याने शहरात अनेक भागात धावा धाव झाली.


 
Top