तुळजापूर : कुमार नाईकवाडी

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) वर्धापन दिनाचे अवचित साधून तुळजापूर येथे सुकेशनी बुद्ध विहाराच्या सभागृहात जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली रिपाइं(A) जिल्हा आधिवेशन संपन्न झाले. याप्रसंगी  रिपाइं मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे,भागवत शिंदे,मराठवाडा विभाग सचिव बंडूभाऊ बनसोडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रारंभी तथागत भगवान बुद्ध व माहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून दिवंगत युवा नेते शिवाजी कदम,दिवंगत रिपाइंचे जेष्ठ मार्गदर्शक विश्वनाथन कदम गुरुजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून या अधिवेशनास सुरुवात करण्यात आली.

यावेळी बोलताना राजाभाऊ ओव्हाळ म्हणाले की, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर बहुजनांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारा एकमेव पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष होय. तेंव्हा कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी निष्ठेने काम करावे, पक्षातून हकालपट्टी केलेले काही कार्यकर्ते रोजगार आघाडीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची दिशाभुल करत आहेत. त्यांच्या पासून सावध राहवे असे सांगून दि. ५ आक्टोबर रोजी उत्तर प्रदेश मध्ये एका मागासवर्गीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या निंदनीय घटनेच्या  निषेधार्थ दि. ५ आँक्टोबर रोजी जिल्हाभर एकाच वेळी तहसील कार्यालया समोर निदर्शने आंदोलन करण्याचे आवाहन केले.

यावेळी रिपाइं चे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, जिल्हा सचिव एस.के गायकवाड, जेष्ठ कार्यकर्ते रविंद्र दादा कदम, युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे, तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, भालचंद्र कटारे, सुभाष सोनकांबळे, अमोल शिंदे, दिगंबर कांबळे,किशोर वाघमारे, रिपाइंचे अरुण कदम, प्रकाश कदम,सूभम कदम ,नाना कदम,सागर सुरवसे, दत्ता बनसोडे,संभाजी गायकवाड, काकासाहेब भंडारे,बालाजी माटे, संपत जानराव, प्रदिप सिरसाट,सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचलन रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम यांनी केले.

 
Top