तुळजापूर : कुमार नाईकवाडी

शारदीय नवरात्र महोत्सवात श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी श्री देवी भक्तानी येवू नये, घरी राहुनच भाविकांनी नवराञ महोत्सव साजरा करावा असे, आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी केले आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जणाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवा च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व जिल्हा पोलीस प्रमुख राज तिलक रोशन यांच्या आदेशानुसार यावर्षी शारदीय नवराञ महोत्सवात तुळजापुरात तगडा बंदोबस्त राहणार आहे. संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे या वर्षी श्री देवी भक्तांनी दर्शनासाठी येवु नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी दि. १५ गुरुवार रोजी आयोजित पञकार परिषदेत माहिती दिली. 

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे म्हणाले की, यावर्षी संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे श्री देवी भक्तांनी श्री क्षेत्र तुळजापुरला येवु नये आपल्या घरीच भाविकांनी नवराञ महोत्सव साजरा करावा, शहराबाहेर तुळजापुर सरहद्दीवर बार्शी रोड, सोलापूर रोड, उस्मानाबाद रोड, लातुर रोड, नळदुर्ग रोड वर बँरिकेटस लावुन त्या ठिकाणी पोलीसांचा मोठा तगडा बंदोबस्त राहणार आहे. त्या ठिकाणी चेकिंग करुनच तुळजापुर शहरात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच तुळजापुर शहरात येणाऱ्या जिवनावश्यक वस्तुसाठी भाजी, विक्री दुध व्यवसाय किराणा माल वाहतुक आदीसह वस्तुना प्रवेश राहणार आहे. तसेच नौकरदार वर्ग, स्थानिक नागरीक, ग्रामीण भागातील भाजी विक्रेते नागरीकांना ही तुळजापुरला येताना आधार कार्ड दाखवूनच प्रवेश देण्यात येणार आहे.

श्री देवी भक्तांना मात्र सोडण्यात येणार नाही. तुळजापुर शहरातील दुकाने आदीसह जिवनावश्यक सेवा जिल्हाधिकारी यांनी ठरवुन दिलेल्या वेळेनुसार चालतील.  तुळजापुरचा घाट हा  शारदीय नवराञ महोत्सवात बंद असणार आहे. बायपास मार्गे एस.टी वाहतुक सेवा आदीसह इतर वाहतुक सेवा सुरुळीत ठेवण्यात येणार आहे. एस.टी. वाहतुक सेवा चालु राहणार आहे. माञ एस.टी वाहतुक सेवा लातुर रोड वरील नवीन बसस्थानकात येणार आहे. फक्त लातुर रोडवरील नविन बसस्थानक सुरु राहणार असून त्या ठिकाणीही पोलीसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे.

तुळजापुर शहरात येणाऱ्या रस्त्यावरही शंभर मीटर व पन्नास मीटर अंतरावर बँरिकेटस लावुन त्या ठिकाणी पोलीसांचा फौज फाटा असणार आहे. त्या ठिकाणी ही तपासणी करुनच आधार कार्ड, ओळखपञ, आयडी प्रुफ पाहुनच तुळजापुर शहरात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरात जाणाऱ्या व्यक्तीना पास पाहुनच मंदीराकडे सोडण्यात येणार आहे. कोणीही भाविक नजर चुकवून श्री तुळजाभवानी मंदीराकडे आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. 

या शारदीय नवरात्र महोत्सवात २९४ पोलीस कर्मचारी, ४० ते ४५ पोलीस अधिकारी तसेच एस.आर.पी.च्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच ६०० होमगार्ड आदीसह पोलीस अधिकारी वर्गाचा मोठा तगडा बंदोबस्त राहणार आहे, अशी माहिती डीवायएसपी टिपरसे यांनी पञकार परिषदेत दिली. या वेळी तुळजापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्यासहह पञकार बांधव उपस्थित होते.

 
Top