तुळजापूर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी तिसऱ्या माळे दिनी पहाटे श्री तुळजाभवानी मातेची नित्योपचार पुजा करण्यात आली. 

तत्पूर्वी श्री तुळजाभवानी मातेचे चरण तिर्थ होवून दार खुले करण्यात आले. यानंतर सकाळी ६ वाजता पंचामृत अभिषेक करवुन तिसऱ्या माळे ची श्री तुळजाभवानी मातेची नित्योपचार पुजा करण्यात आली. त्यानंतर धुपारती करुन अंगारा काढण्यात आला. यावेळी श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत, मुख्य भोपे पुजारी, सेवेदारी आदीसह मोजक्याच लोकांच्या उपस्थित सेवा करण्यात आली. 

संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात भाविकांना प्रवेश बंद आहे. सध्या श्री तुळजाभवानी मातेचे ऑनलाईन दर्शन भाविक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. त्यामुळे भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाचे घरी बसुनच श्री देवीचे दर्शन मिळत असल्यामुळे श्री देवी भक्तामधुन समाधान प्राप्त होत आहे. 

सायंकाळी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात प्रक्षाळ पुजा, छबीना आदीसह धार्मिक विधी मोठ्या भक्तीमय वातावरणात मोजक्याच लोकांच्या उपस्थित पार पडल्या. उद्या दि. २० मंगळवार रोजी लंलीत पंचमी निम्मीत श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात रथ अलंकार महापुजा मांडण्यात येणार आहे.

 
Top