नळदुर्ग, दि. 09 : येथील बंद असलेल्या श्री तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्यातील यंञाचे सुटे भाग अंदाजे ४२ हजार पाचशे रूपयाचा माल अज्ञात चोरट्याने भर दिवसा गुरूवारी दुपारी लांबवल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्री तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना, नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील प्लॅन्जड सीआय व एक कन्टीन्युअस सेपरेटर मशिनचे सुटे भाग एसएस एकुण किं.अं 42,500/-रु. चा माल अज्ञात चोरट्याने दि. 08.10.2020 रोजी 13.00 वा. सु. चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या साखर कारखाना कर्मचारी- विकास बाबुराव भोसले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top