✏ तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स | दि. 12 ऑक्टोबर 2020
🎯 *ताज्या अपडेटसाठी लॉग ईन करा -* www.tuljapurlive.in
----------------------------------------------------
✍🏻 *संकलन :- विकास नाईक 📱 8668973422*
----------------------------------------------------
उस्मानाबाद : जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले; सोयाबीन पुन्हा पाण्यात तर हजारो हेक्टरवरील ऊस भुईसपाट; अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली...
उस्मानाबाद : ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत; हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला...
तुळजापुर : श्री तुळजाभवानी मंदीर उघडण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मंगळवारी तुळजापुरात लाक्षणिक उपोषण....
नळदुर्ग : माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याकडून रामतीर्थ येथील उच्चपातळी बंधा-याची पाहणी...
उस्मानाबाद : रस्त्यालगतच्या चारीचे पाणी शेतक-यांच्या गोठ्यासह शेतात घुसुन 8 टन कांदे व 10 क्विंटल सोयाबीन वाहुन गेल्याची घटना घडली आहे....
भूम : लखपतीचे आमिष दाखवुन भुम येथील तरुणाला 33 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला; 25 लाख रुपये मिळणार असल्याची सांगुन केली फसवणूक...
उमरगा : मुसळधार पावसामुळे उमरगा ते डिग्गी रोडवरील बेडगा शिवारातील पुलाचा काही भाग वाहुन गेल्याची डिग्गी गावाचा संपर्क तुटला....
वाशी : तब्बल तीस तासानंतर वाशी शहरासह तालुक्यातील काही गावांचा वीज पुरवठा झाला सुरळीत...
उस्मानाबाद : बेंबळी येथे चोरट्यांनी किराणा दुकान फोडून सुमारे 70 हजार रुपयांचा मुद्देमाल केला लंपास...
औरंगाबादमध्ये आयपीएल सट्टा लावणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. अबुधाबीमधील सामन्यावर सट्टा लावत होता. जुना मोंढा भागात जिन्सी पोलिसांनी ही कारवाई केली...
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बोराळा गावात 9, 10 आणि 11 ऑक्टोबर या तीन दिवसात तीन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिन्ही आत्महत्येची कारणे वेगवेगळी असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद....
हाथरस प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात आज सुनावणी; पीडितेचं कुटूंब पोलीस बंदोबस्तात लखनौला रवाना...
-------------------------------------------------
🌀 *आपणही आम्हाला बातम्या पाठवू शकता. व्हाटसअप नंबर 📱 8668973422*
🌐 *फेसबुक पेज लाईक करा -* https://www.facebook.com/livetuljapur
--------------------------------------------------
