उस्मानाबाद, दि. 05 : उस्मानाबाद जिल्हयात आज गुरुवार दि. 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 59 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 1 जणाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 187 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 14 हजार 954 इतकी झाली आहे. यातील 13 हजार 959 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 541 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 454 जणांवर उपचार सुरु आहेत.






 
Top