नळदुर्ग : एस.के. गायकवाड 

खुदावाडी ता. तुळजापूर येथे गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असेले सौरऊर्जा पंपाचे काम विद्दमान सरपंच शरद नरवडे यांच्या प्रयत्नाने पुर्ण करण्यात आले असून विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तुकाराम बोंगरगे यांच्या हस्ते सदर सौरऊर्जा पंपाचे उदघाटन करण्यात आले.

सन २०१८ मध्ये खुदावाडी येथे महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण योजने अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनसाठी मंजूर असलेले सौरऊर्जा पंपाचे काम अर्धवट अवस्थेत प्रलंबित होते. सरपंच शरद नरवडे यांनी संबंधित महाराष्ट्र सौरऊर्जा जालना व जिल्हा उर्जा कार्यालय बिड याना वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला व अखेर हे काम पूर्ण करून घेतले असून विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तुकाराम बोंगरगे यांच्या हस्ते या सौरऊर्जा पंपाचे उदघाटन करून लोकार्पण करण्यात आले. 

यावेळी गावचे सरपंच शरद नरवडे, ग्रामसेवक मोकाशे, माजी पं. स. सदस्य महादेव सालगे, रमेश पाटील, किरण घोडके, नागनाथ घोडके, पांडुरंग व्हलदुरे, दगडू गायकवाड, भास्कर व्हलदुरे आदी उपस्थित होते.

 
Top