तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी व परिसरातील गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुथ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तामलवाडी येथे दि. ४ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या या बुथ बैठकीस युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हाभर बुथ बैठका घेण्यात येत असुन दि. ४ रोजी तुळजापूर तालुक्यातील काटगाव जिल्हापरिषद गटातील तामलवाडी, पिंपळा बु., देवकुरूळी, तसेच इतर गावा गावामध्ये बुथ कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या या बैठकीस युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत होता.
दि. ४ रोजी सांयकाळी ८ वाजता तामलवाडी येथे आदित्य गोरे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले.तामलवाडी येथील या बैठकीस शेकडो युवक सामील झाले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदेशानुसार या बैठकांचे आयोजन करण्यात आले असून सत्तेसाठी राष्ट्रवादी सोडून जे गेलेत त्यांचा विचार न करता जिल्हाभर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी करून पक्ष मजबूत करायचा असल्याचे गोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.तसेच युवकांचा हा उत्फुर्त प्रतिसाद पाहून खर्या अर्थाने आम्हाला उर्जा मिळते आहे.लवकरच तुळजापूर तालुक्यातील पदाधिकारी निवड प्रक्रिया होणार असल्याचेही यावेळी आदित्य गोरे यांनी बोलताना सांगितले.
याप्रसंगी शत्रुघ्न लोंढे,बसवणप्पा मसुते, सर्जेराव गायकवाड, सुधीर पाटील, विश्वजित चुंगे, समाधान गायकवाड, निरंजन करंडे, उमेश गायकवाड, महेश गायकवाड, शुभम पाटील, प्रशांत गायकवाड, मारुती गायकवाड, प्रशांत राऊत, योगेश निकम, अमोल गायकवाड, राम कांबळे, अजय गायकवाड, विनोद घोटकर, तानाजी घोटकर, किरण माळी, सुरज गायकवाड, शिवाजी म्हेत्रे,संजय घोटकर, विजय घोटकर, सुरज जाधव, दशरथ घोटकर आदी शेकडो युवक उपस्थित होते.