येरमाळा, दि. 05 : चालक- जालींदर मुगुटराव कुतवळ, रा. आलेगांव, ता. दौंड, जि. पुणे हे दि. 20.10.2020 रोजी रात्री 04.00 वा. सु. येरमाळा- कळंब रस्त्याने महीद्रा सुप्रो टीफोर क्र. एम.एच. 42 एक्यु 1281 मध्ये जिओ कंपणीच्या मोबाईल मनोऱ्याचे (टॉवर) साहित्य घेउन जात होते. प्रवासादरम्यान येरमाळा जवळ रस्ता खराब असल्याने वाहनाची गती कमी झाल्याचा फायदा घेउन अज्ञात चोरट्याने वाहनाच्या पाठीमागील हौदात असलेले जिओ कंपनीचे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या जालींदर कुतवळ यांनी दि. 04.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा, दि. 05 : सिध्दांत डिगंबर शिंगे, रा. रामलींग (मु.), ता. निलंगा यांनी दि. 28.10.2020 रोजी 13.30 वा. सु. उमरगा येथील बिराजदार हॉस्पीटलसमोर स्वत:ची हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 12 ईए 8252 ही लावली होती. ती त्यांना 16.30 वा. सु. लावल्या जागी आढळुन आली नाही. यावरुन ती अज्ञात चारट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या सिध्दांत शिंगे यांनी दि. 04.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.