उस्मानाबाद, दि. 23 : प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र शासन यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली औरंगाबाद विभाग (मराठवाडा) पदवीधर मतदार संघाची निवडणूक निमित्ताने पक्ष बांधणी व निवडणुक या संदर्भात आढावा बैठक पुष्पक पार्क उस्मानाबाद याठिकाणी   घेण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना मा.आमदार बच्चू भाऊ कडू म्हणाले की पदवीधर शिक्षक मतदार निवडणूकीच्या निमित्ताने पक्षाची बांधणी मजबूत असली पाहिजे, निवडणूक ही कार्यकर्त्यांच्या जीवावर लढली जाते त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी उभी असावी लागते. ही निवडणूक म्हणजे  उमेदवाराची परीक्षा नसून खरी तर कार्यकर्त्यांची परीक्षा आहे. कार्यकर्ता हा पदासाठी मुळीच नसावा तर त्या पदाला निष्ठेने, प्रामाणीकपणे, मेहनतीने आणि निस्वार्थी भावनेने न्याय देणारा असला पाहिजे. या निवडणुकीतून प्रहार जनशक्ती पक्षाची ताकद लक्षात येणार आहे. त्यातूनच पक्षाची मजबूत  बांधणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा.सचिन ढवळे सर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करायचे आहे त्यासाठी सर्व प्रहार सैनिकांनी तळमळीने आणि निष्ठेने काम करा आणि मराठवाडा विभागातील पदवीधरांचे प्रश्न  सोडवण्यासाठी आठ जिल्ह्याचा आमदार म्हणून विधान परिषदेत पाठवा असे तोलामोलाचे मार्गदर्शन सर्व संघटना पदाधिकारी,पक्षाचे पदाधिकारी यांना केले.

याप्रसंगी  विमलताई अनारसे प्रहार जनशक्ती पक्ष प्रदेशाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सयाजीराव देशमुख, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, विशाल अंधारे, अपंग कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष रोहिदास भिसे, प्रहार विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष अविनाश हराळ, नागनाथ पाटील, नवनाथ मोहिते, बाळासाहेब पाटील, जमीर शेख, शिवकुमार माने, महादेव चोपदार, शशिकांत मुळे, नागेश कुलकर्णी, महेश माळी, महंमद आतार, बाबासाहेब भोईटे, आदि पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top