तुळजापूर : कुमार नाईकवाडी
दिपावली सणानिमित्त गोरगरीब जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार गंगणे यांच्यावतीने मंगळवार दि. १० रोजी सामाजिक बांधिलकी जपत शहरातील पापनाश नगर, विवेकानंद नगर भागातील गोर गरीब 400 कुटुंबांना दिवाळी व भाऊबीज भेट म्हणून किराणा व दिपावली सणासाठी आवश्यक असणा-या साहित्याचे किट्स सभापती विजयकुमार गंगणे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम, मनोज गवळी यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
सदरील किराणा साहित्यामध्ये रवा, मैदा, साखर, हिरा बेसन, डालडा, शेंगदाणे, दाळे, चुरमुरे, हळद, मिर्ची पावडर, तेल पीशवी, चिवडा मसाला, मोती साबण, सुगंधी तेल बाटली, उटणे, शॅम्पु यासह वाफ घेण्याचे मशिन व N95 मास्क यांचे वाटप करण्यात आले.
तसेच सभापती गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुर्वी देखील वेळोवेळी समाजातील गोरगरीब व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी किराणा साहित्याचे किट, गहु, तांदुळ इत्यादी अन्नधान्य, मस्क सॅनिटायझर, अर्सेनिकम अल्बम गोळया, मुस्लीम समाजबांधवांना रमाजान ईद निमित्त शिरखुर्मा साहित्याचे किट इत्यादी वाटप करण्यात आलेले असल्याचे मनोज गवळी यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सभापती गंगणे यांनी गोर गरीब व वंचित घटकांचे मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगून गोर गरीब जनतेसाठी आणखीही शक्य तेवढी मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही यावेळी दिली. याप्रसंगी विजयकुमार गंगणे व मनोज गवळी मित्रमंडळाचे सभासद, पत्रकार, नागरीक व कार्यकर्ते उपस्थित होते