नळदुर्ग, दि. 10 : मनिषा लक्ष्मीकांत कालेकर, वय 24 वर्षे, रा. रा. वडगाव (देव), ता. तुळजापूर यांनी दि. 08.11.2020 रोजी सासरी- वडगाव (देव) येथील राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली होती. मनिषा यांच्या चोळीच्या कार्यक्रमात सासरकडील लोकांना योग्य मानपान व भेटवस्तू न दिल्याच्या कारणावरुन 1)लक्ष्मीकांत विनायक कालेकर (पती) 2)विनायक कालेकर (सासरा) 3)मंगलबाई कालेकर, तीघे रा. वडगाव (देव), ता. तुळजापूर यांनी वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. या छळास कंटाळून मनिषा यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मनिषा यांचे भाऊ- गणेश काशिनाथ कुनाळे, रा. एकुरगा, ता. उमरगा यांनी काल दि. 09.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 498 (अ), 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.