उस्मानाबाद, दि. 10 : सुरज जाधव, आदेश जाधव, विश्वास जाधव, महादेव जाधव, अनिता जाधव, इंदुबाई जाधव, सर्व रा. वडगाव (सि.), ता. उस्मानाबाद यांनी दि. 21.09.2020 रोजी 09.30 वा. सु. वडगाव (सि.) येथे भुखंड विक्रीच्या वादावरुन राजेंद्र तिमण्णा कुन्हाडे, रा. पापनाश नगर, उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, फायटरने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच राजेंद्र कुऱ्हाडे यांच्या खिशातील रोख 8,500/- रु. रक्कम काढून घेतली. अशा मजकुराच्या राजेंद्र कुऱ्हाडे यांनी दि. 09.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 323, 324, 325, 326, 395, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग, दि. 10 : सुरेखा कराड, रा. हगलुर, ता. तुळजापूर या दि. 07.11.2020 रोजी 14.00 वा. सु. मानेवाडी येथील स्वत:च्या शेतात गेल्या. यावेळी शेतजमीनीच्या भाडणाच्या कारणावरुन गावकरी- भारत जाधवर, विजाबाई जाधवर या दोघा पती- पत्नींसह मानेवाडी येथील रहिवाशी- महादेव मदने, इंदुबाई मदने, द्वारका मदने यांनी सुरेखा कराड यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. आईच्या बचावास पुढे आलेल्या स्वप्नालीसही नमूद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या सुरेखा कराड यांनी दि. 09.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद पाच जणांविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी, दि. 10 : शेतजमीन वाटणीच्या कारणावरुन 1)मोहन क्षीरसागर 2)कुशाल क्षीरसागर 3)किरण क्षीरसागर 4)लक्ष्मण क्षीरसागर 5)सत्यवान गुंड 6)शकुंतला क्षीरसागर 7)नंदाबाई गाटे 8)कुसूम आडेकर 9)लक्ष्मी गुंड, सर्व रा. पांगरधरवाडी, ता. तुळजापूर यांनी दि. 07.11.2020 रोजी 18.30 वा. सु. स्वत:च्या घरासमोर भाऊबंद- प्रकाश रावन क्षीरसागर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शेतजमीनीचा हिस्सा मागीतल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रकाश क्षीरसागर यांनी दि. 09.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.