उस्मानाबाद : महेश पाटील
उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळा आज पासून शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष जूनला न चालू होता तब्बल पाच महिने पुढे ढकले. बेंबळी ता. उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद शाळा आजपासून सुरु झाली. त्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींना तुळजापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख यांच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी राजभाऊ नळेगावकर, महेश पाटील, आसिफ पठाण, जफर शेख, इरफान शेख, मदार शेख, अहेमद दर्याजी, मुबीन पठाण, हणमंत सरवदे मुख्याध्यापक तोसिफा, पटेल आदिजण उपस्थित होते.