प्रतिकात्मक

नळदुर्ग, दि. 23 : तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे तरुण शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे.

सर्जेराव मारुतीराव काटे रा. खुदावाडी ता. तुळजापूर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी व ओला दुष्काळाचा सर्वाधिक फटका उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे. दुबार पेरणीनंतर होता तोंडाशी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  यंदाची दिवाळी देखील शेतकऱ्याने साजरी केली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचे सत्र थांबायला तयार नाही असे निदर्शनास येत आहे.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसान आणि कर्जबाजारीपनाला कंटाळून सर्जेराव काटे यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आणि आई असा परिवार आहे.

 
Top