उस्मानाबाद, दि. 22 : आम आदमी पार्टीने दिल्ली मध्ये सरकार बनविल्यानंतर प्रत्येक प्रश्नाची माहिती घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दिल्लीतील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सरकारी शाळेसह खासगी शाळांनाही सरकारने काही नवीन अटी नियम घालून दिल्या आहेत. त्यामुळे दिल्लीतील सरकारी शाळेतील शैक्षणिक दर्जा सुधारला आहे. पदवीधर मतदार संघातील पदवीधारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आजपर्यत कोणीच काही केलेले नाही. मात्र आम आदमी पार्टी पदवीधर मतदार संघात काम करेल, अशी माहिती पदवीधर मतदार संघातील आम आदमी पार्टीचे उमेदवार डॉ. रोहीत बोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पदवीधर मतदार संघातील प्रचार दौऱ्यासाठी डॉ. बोरकर हे रविवार दि. २२ नोव्हेंबर रोजी उस्मानाबादेत आले होते. यावेळी आम आदमी पार्टीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अॅड. अजित खोत, सरचिटणीस मुन्ना शेख उपस्थित होते. अॅड. अजित खोत यांनी सामान्य लोकांची निवडणुक लडविण्याचे काम आम आदमी पार्टी तर्फे करीत आहोत. पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम आदमी पार्टी गंभीर असून बेरोजगारांची समस्या, विद्यार्थ्यांचे आंदोलन, शिक्षणातील बाजारीकरण आदी समस्या बाबत आम आदमी पार्टी भरीव असे काम करेल असे सांगितले.
डॉ. बोरकर यांनी पदवीधरांचे प्रश्न सोडविण्याचे यापुढे काम नाही झाले तर आत्महत्या वाढतील, त्यासाठी भविष्य चांगले घडविण्यासाठी व उस्मानाबाद हिंगोली येथे पुर्ण विद्यापीठ होण्यासाठी आपल्याला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.