जळकोट : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी सदिच्छा भेट देऊन आगामी होऊ घातलेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने व इतर शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर चर्चा करून जळकोट मधील विविध प्रश्नावर चर्चा केली.

जळकोट येथे जवाहर महाविद्यालयाचे  प्रा. डॉ.  अंकुश कदम (केंद्रिय अध्यक्ष बामुक्टा संघटना ,औरंगाबाद व जिल्हाध्यक्ष, अविष्कार फाऊंडेशन इंडिया ) यांच्या शिवाजी चौकातील निवासस्थानी जळकोट व परिसरातून आलेल्या पदवीधर, विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक नेते मंडळी व पक्ष पदाधिकारी यांच्यासमवेत आमदार सतीश चव्हाण यांनी संवाद साधून विविध अडचणी समजून घेतल्या. आ. चव्हाण यांनी भाषण करण्याऐवजी सर्वांचे प्रश्न ऐकून घेतले. व या प्रश्नावर तात्काळ निर्णय घेऊन उत्तरे दिली. या

 संवाद दरम्यान शैक्षणिक संस्थांच्या समस्या संदर्भात अनेकांनी आमदार सतीश चव्हाण यांच्यासोबत संवाद साधला. जळकोट येथील मुंबई -हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गात संपादित झालेल्या व घरांची पडझड झालेल्या लाभधारकांना मावेजा मिळविण्यासाठी कृष्णात मोरे यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्यासमोर प्रश्न मांडला असता, या प्रश्नावर केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार तक्रार मांडणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले. 

या संवाद दरम्यान आमदार सतीश चव्हाण यांचा प्रा. डॉ. अंकुश कदम यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण व तुळजाभवानी कारखान्याचे संचालक अशोकराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी अशोक पाटील , प्रकाश चव्हाण, महेश कदम, शिवराज स्वामी   दिलीप माने , काँग्रेस नेते नितीन बागल , गजेंद्र कदम, जितू पाटील , विजयकुमार मोरे ,पंडित पाटील, डॉ. संजय कदम ,श्रीनिवास पाटील, शिवराम कदम, सचिन कदम, ब्रह्मानंद कदम , अमोल आलुरे आदिसह पदवीधर मतदार, विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पक्ष कार्यकर्ते, जळकोट परिसरातील नागरिक, गावातील नागरिक व युवक उपस्थित होते.

 
Top