नळदुर्ग, दि. 07 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज दि. ७ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध रस्त्याच्या खडयामध्ये "बेशरमाचे झाडे" लावून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले
यापूर्वी मनसेच्या वतीने शहरातील बसस्थानक ते किल्ला गेट पर्यंतचा रस्ता दुभाजक पध्दतीने करून सुशोभित करावा, डीएड कॉलेज रोड(रहीम नगर) येथील रस्ता तात्काळ सुरू करावा, शास्त्री चौक ते नानीमा दर्गाह रोड(सोलापूर हायवेला जोडणारा), शास्त्री चौक ते (हू.स्मारक) हायवे लगत जोडणारा रस्ता, मराठा गल्ली येथील रस्ता आदी रस्त्या संदर्भात पालिकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते. तसेच उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु पालिकेने लेखी आश्वासन दिल्या मुळे उपोषणास तात्पुरती स्थगिती दिली होती.
लेखी आश्वासन देऊन एक महिने होत आहेत. अद्याप पर्यंत पालिकेने कोणत्याही रस्त्याचे काम सुरू केले नाही. पालिका या रस्त्याविषयी ठोस पावले उचलत नाही, चालढकल करीत आहे. म्हणून आज मनसेच्या वतीने रहीम नगर येथील व नांनीमा दर्गाह रोड वरील रस्त्याच्या खड्यामध्ये बेशरमाचे झाडे लावून पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, उपाध्यक्ष रमेश घोडके, संदीप वैद्य आदी उपस्थित होते.