तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

संसर्गजन्य कोरोना महामारीमुळे गेल्या ९ माहिन्यापासुन तुळजापुर तालुका मंडप काँन्ट्रेक्टर अँन्ड डेकोरेशन अशोशिएन, आदीसह कर्मचारी वर्गाचा व्यवसाय ठप्प झाल्याने हाताला काम नसल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये मंडप कार्यालय, हाँल लाँन्सच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या आसन क्षमतेची परवानगी द्यावी किंवा ५०० व्यक्तीच्या उपस्थित कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात यावी, अशा प्रकारचे एक लेखी निवेदन तुळजापुर तालुका मंडप असोसिएशनच्या वतीने तहसीलदार यांना सोमवार दि. २ नोव्हेंबर रोजी देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, संसर्गजन्य कोरोनामुळे आमचा व्यवसाय बंद पडला आहे. कर्मचारी वर्गाना हाताला काम नसल्यामुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. तरी प्रशासकीय यंत्रणाद्वारे कमीत कमी क्षमतेच्या व्यक्तीच्या लोकासांठी कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

या निवेदनावर  तुळजापुर तालुका मंडप काँन्ट्रेक्टर असोसिएशनचे दत्ता भोसले, नारायण भोसले, नरेश पेंदे, संजय केवडकर, सुरेश कावरे, दत्ता तांबे, अजित माडजे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top