अचलेर : जय गायकवाड
कोरोना या रोगाने खूप मोठे संकट निर्माण केले आहे.त्यामुळे शाळा महाविद्यालये जरी बंद असले तरी.ऑनलाईन शिक्षण चालू आहेच त्याचबरोबर शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना योग्य अंतराचे पालन करून अगदी जबाबदारीने प्रत्येक ठिकाणी शालेय पोषण आहार सुद्धा वाटप करण्यात येत आहे.
आज सोमवार दिनांक २ रोजी उमरगा तालुक्यातील वरनाळ (वाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार वाटप करण्यात आले.
यावेळी मात्र इयत्ता चौथी वर्गात शिकणारा विद्यार्थी पृथ्वीराज पाटील हा चक्क घोड्यावर बसून आल्याचे पहावयास मिळाले. घोड्यावर बसून आलेल्या या विद्यार्थ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र समन सहशिक्षक संतोष बोडरे,श्रीकांत कनकधर,राजगुरू गिरी,उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार नियोजन पूर्वक वाटप करण्यात आले..
"घोड्यावर बसून आला..अन् शालेय पोषण आहार घेऊन गेला" हा मात्र चर्चेचा विषय ठरला..!!