तुळजापूर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारातील शारदीय नवराञ महोत्सव व कोजागिरी पोर्णिमा संपताच श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्य पावन नगरीत राहणाऱ्या तुळजापूर शहरवाशियांना श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापुर यांच्या कडून रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी रविवार रोजी १५ हजार प्रासादीक लाडूचे वाटप करण्यात आले.
संसर्गजन्य कोरोनामुळे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी शहरातील अनेक नागरीकांना मंदीरात येता न आल्यामुळे श्री देवीचा प्रसाद म्हणून श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने शहरात राहणाऱ्या नागरीकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. शहरातील राहणाऱ्यांना घर टु घर या ठिकाणी जाऊन श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, हाऊस किपिंग कर्मचारी, सुरक्षा रक्षक आदीसह कर्मचारी वर्गानी घरोघरी प्रसादाचे वाटप केले.