नळदुर्ग : जे थांबले ते तलावातील पाण्यासारखे असतात मात्र आपले कार्य सुरूच आहे म्हणजे वाहत्या पाण्यासारखे आहे व समाजकार्यातील लक्ष प्राप्ती कडे आपली वाटचाल सुरू असून त्याच प्रमाणे आपले कार्य सुरू असावे. कारण मोठ्या कार्याची सुरुवात लहान कार्या पासूनच होते.त्यामुळे आपण जे गोरगरीब गरजूवंत लोकांना मदत करण्याचे कार्य  करीत आहोत ते कौतुकास्पद आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजूरे यांनी येथील नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशन व नुरानी ग्रुपच्यावतीने 30 ऑक्टोबर रोजी पैगंबर जयंतीचे औचित्य साधून शहरातील गरीब महिलांना साड्या वाटप व कोरोनाच्या काळात आपले जीव धोक्यात घालून बहुमूल्य सेवा देणारे आरोग्य व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कारा प्रसंगी उपस्थित लोकांना मार्गदर्शन करताना केले.  

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हाफेज सय्यद मैनोद्दीन जाहगीरदार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ईद-ए-मिलाद कमिटीचे प्रमुख आलेम मोहम्मद राजा हे होते. यावेळी डॉ सिद्रामप्पा खजुरे ,डॉ. जसराज वडणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल जानराव, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ महेश शिंदे, भरत मंगरुळे, डॉ.तेजस काळे, डॉ यशवंत नरवडे, डॉ. आलमगीर मंडल, आरोग्य सेविका फुले, पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक,  प्रा. पांडुरंग पोळे, आयुब शेख, उत्तम बनजगोळे, इरफान काजी, दादासाहेब बनसोडे, प्रकाश गायकवाड,मोहियोद्दीन शेख यांच्यासह इत्यादी जणांचा कोरोनाच्या महामारी मध्ये वैद्यकीय सेवेतून तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वरील कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहरातील साठ गरीब महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. 

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष लतीफ शेख, कोषाध्यक्ष रुकनोद्दीन शेख, युनुस शेख, खालेद इनामदार, अलीम शेख यांच्यासह हुसेन मौजन,एजाज कुरेशी,आबेद शेख, अख्तर कुरेशी जावेद शेख, हुजूर शेख, सईद बागवान, अकबर शेख, युसुफ शेख, दानिश शेख यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार आयुब शेख यांनी केले.

 
Top