नळदुर्ग, दि. 05 : केबल वायर अंथरण्याच्या कारणावरुन 1)अशोक धेनु चव्हाण 2)शशीकांत धेनु चव्हाण 3)संतोष धेनु चव्हाण, तीघे रा. निलेगांव तांडा, ता. तुळजापूर यांनी दि. 04.11.2020 रोजी 12.00 वा. सु. अल्लामाबी शकील नदाफ, रा. नन्हेगांव, ता. अक्कलकोट यांच्या निलेगांव सर्वे क्र. 180 मधील 3 एकर ऊसाच्या पिकास आग लावून नदाफ यांचे अंदाजे 5,00,000 ₹ चे आर्थिक नुकसान केले. यावर अल्लामाबी नदाफ यांनी त्या तीघांस जाब विचारला असता त्यांनी अल्लामाबी यांसह त्यांच्या मुलास शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अल्लामाबी नदाफ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.