तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात गुरुवार दि. ५ नोव्हेंबर रोजी "दार उघड उद्ववा दार उघड "अशी हाक देत राज्यभरातील मंदीरे उघडण्यासाठी भाजपाचे अध्यात्मिक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली साधु संताचे बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.
अनेकवेळा आंदोलने व मागणी करुनही ठाकरे सरकार जाणीवपुर्वक मंदीरे उघडण्याचा निर्णय घेत नसल्याने आता मंदीरे उघडण्याची मागणी मान्य होईपर्यत अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी महाराष्ट्रातील प्रमुख धर्माचार्य साधु संत, अनेक धार्मिक संघटनासह श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरासमोर ठिय्या आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेण्यात आला.
प्रथम राजे शहाजी महाद्वार समोर श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेची यथासांग पुजा करुन महाआरती करुन ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. राज्य सरकारला "श्री आई तुळजाभवानी सध्दबुद्धी दे! या सरकारला जाग येवू दे" अशी भावनिक साद घालून गोधंळी गित गाऊन महाआरती करण्यात आली.
दरम्यान, धरणे आंदोलकाच्या वतीने उपजिल्हाधिकारी गिरी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटंले आहे की, जो पर्यत महाराष्ट्रातील मंदीरे उघडण्यात येत नाही तो पर्यत आम्ही धरणे आंदोलन चालूच ठेवणार आहोत. या सरकारने खुप आश्वासने दिली आता आम्ही माघार घेणार नाही, असा आक्रमक पविञा आंदोलकानी घेतला आहे.
यावेळी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. नितीन काळे, माजी जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, तुळजापुर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा नेते विनोद गंगणे, नागेश नाईक, शिवाजी बोधले, गुलचंद व्यवहारे, सुहास सांळुके, अविनाश गंगणे, विशाल रोचकरी, सागर कदम, ॲड. दिपक आलुरे, विक्रम देशमुख आदीसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच या धरणे आंदोलनात महाराष्ट्र भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडी प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले, शंभुनाथ मावजीनाथ महाराज तुळजापूर, सुरेंद्रनाथ विरभद्र महाराज तुळजापूर, एकनाथ महाराज लोमटे मलकापुर, राजेश महाराज देगलूरकर, संजय जोशी महाराज औरंगाबाद, भाऊ महाराज प्रसंगीकर आळंदी ग्रुप नांदेड, सुदर्शन महाराज महानुभव औरंगाबाद, भारती महाराज माहुरगड, सुरेंद्र महाराज मस्के हिंगोली, सुरेश काशिनाथराव ढगे निलंगा, व्यंकट महाराज तुळजापूर, माऊली महाराज होळकर रेनापुर, गोपीनाथ किसन बानगुडे महाराज परंडा, महादेव सुब्राव देशमुख महाराज गोंदेगाव लातूर, ज्ञानेश्वर बाबुराव महाराज निमगाव, हरिदास देशमुख महाराज परभणी, रमाकांत भोसले महाराज गिरगावकर, सुनील महाराज औरंगाबाद, अशोक कापसे निलंगा, भानुदास महाराज खेडकर, निलंगा रामभाऊ महाराज निलंगा, नरेंद्र कापसे चिखली बुलढाणा, लक्ष्मण सोळंके चिखली, गुरुप्रितसिंग महाराज नांदेड आदीसह साधुसंत या आंदोलनात सहभागी होते.