उस्मानाबाद, दि. 21 : पोलीस ठाणे आनंदनगर येथे सन 2018 साली कलम 363, 366(अ), 376(2)(1)(जे), भा. दं. सं सह बा. लै. अ. प्र. का. कलम 4, 6 पर्माणे गुन्हा दाखल झला होता. त्याचा तपास तत्कालीन पोउपनि श्री. माने यांनी करुन आरोपी विरुध्द मा. सत्र न्यायालय, उस्मानाबाद येथे दोषारोप पत्र दाखल केले होते. त्या खअल्याचा निकाल आज रोजी जाहीर झाला. यात मा. सत्र न्यायालयाने आरोपी आश्रुबा ऊर्फ अशोक रामलिंग डोके रा. सातेफळ ता. कळंब यास पोस्को कायदा अंतर्गत 07 वर्षे सJम कारावास व 3,800 रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अति.शासकीय अभियोक्ता श्री. सचिन सुर्यवंशी यांच्याकडून प्राप्त माहिती अशी की, दि १७ मार्च २०१८ रोजी पिडीत मुलीचे वडिलांनी पो.स्टे.आनंद नगर, उस्मानाबाद येथे हजर राहुन त्यांच्या अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने धमकी देवून पळवून नेले बाबत तक्रारी अर्ज दाखल केला होता. सदरील तक्रारी अर्जावरून गु.र.नं. ७३/२०१८ नोंद होवुन अज्ञात इसमाविरूध्द भा.दं.वि. चे कलम ३६३, ३६६ अ, नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. संतोष माने यांनी केला.
सदर प्रकरणाच्या तपासात असे निष्पन्न झाले की, सदर आरोपीने पिडीतेस ती शाळेतून मैत्रीणीसोबत घरी येत असताना माइया सोबत आली नाहीस तर, तुइया बहिणीस मारून टाकीन अशी धमकी देवुन तिस पळवुन पुणे येथे घेवुन गेला व त्याठिकाणी एका रूमवर नेहुन पिडीतेवर लैंगीक अत्याचार केले. सदर प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर सदर आरोपीविरूध्द भा.द.वि.चे कलम ३६३, ३६६अ, ३७६(२)(आय)(जे), ५०६ व पोक्सो कायदयाचे कलम ४, ६ नुसार मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरणाची सुनावणी तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती आर.जे.राय मॅडम यांचे न्यायालयात पुर्ण झाली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण १७ साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात पैरवी कर्मचारी म्हणुन श्री. बाळासाहेब आवताडे, पो.कॉ. यांनी काम पाहिले. सदर प्रकरणात पिडीता, पिडीतेची मैत्रीण, शाळेचे मुख्याध्यापक व वैदयकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली.
सदर प्रकरणात आलेला ठोस तोंडी पुरावा व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सुर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून मा.न्यायालयाने आरोपी नामे आश्रुबा उर्फ अशोक रामलिंग डोके यास भादवि चे कलम ३७६ (२) (आय)(जे), ३६३, ५०४ व पोक्सो कायदयाच्या कलम ४ नुसार दोषी धरून सदर आरोपी नामे आश्रुबा उर्फ अशोक रामलिंग डोके यास पोक्सो कायदयाचे कलम ४ नुसार ७ वर्ष सक्तमजुरी व ३०००/- रू दंड व भा.द.वि.चे कलम ३६३ नुसार ६ महिने सक्तमजुरी व ५००/- रू दंड व भा.द.वि.चे कलम ५०६ नसार २ महिने सक्तमजुरी व ३००/- रू दंडाची शिक्षा दि. २१. डिसेंबर रोजी सुनावली. वरील सर्व शिक्षा एकत्रीत भोगावयाचे आहेत.