चिवरी : राजगुरू साखरे

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील लक्ष्मी नगरमध्ये खंडोबा मंदिरात लोकवर्गणीतून अश्वांची मूर्ती स्थापना करण्यात आली. खंडोबाचे वाहन असणाऱ्या अश्वांची विधिवत पूजा करून मूर्ती बसवण्यात आली. यावेळी श्री खंडोबाची अश्वांची गावांमध्ये छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बेभान होऊन वारू हलगीच्या तालावर नाचत होते.

येळकोट येळकोट जय मल्हार  जयघोषाने  चिवरी नगरी  दुमदुमून गेली होती. यामध्ये ठीक ठिकाणी महिलांनी अश्वांची पंचारती करून औक्षण केले. यात परिसरातील वारू मंडळींनी हजेरी लावली होती. तसेच मूर्ती प्रतिष्ठापना स्थापना झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करून सोहळा संपन्न करण्यात आला.

हा सोहळा पार पडण्यासाठी वसंत यादव, विठ्ठल झिंगरे, गणेश बनसोडे,  लक्ष्मण साखरे, शंकर झांबरे, गोपाळ शिंदे, दत्ता झिंगरे,बलभीम राजमाने,दया इंगळे आदी वारू मंडळीसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

 
Top